मालवणचे लिओ वराडकर दुसर्‍यांदा आयर्लंडचे पंतप्रधान !

डावीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आयर्लंडचे लिओ वराडकर

लंडन – मूळचे सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण येथील असलेले लिओ वराडकर आयर्लंडच्या पंतप्रधानपदी दुसर्‍यांदा विराजमान झाले आहेत. वर्ष २०१७ मध्ये ते सर्वप्रथम आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून निवडून आले होते. भारताचेे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. लिओ यांचे वडील अशोक वराडकर हे वर्ष १९७३ मध्ये भारतातून आयर्लंडला गेले होते. वर्ष २०१७ मध्ये अवघ्या ३८ वर्षांचे असतांना लिओ वराडकर आयर्लंडचे पंतप्रधान झाले होते. ते आयर्लंडचे सर्वांत अल्प वयाचे पंतप्रधान ठरले होते. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी भारताच्या दौर्‍यावर आल्यावर त्यांच्या मालवण येथील मूळ गावी भेटही दिली होती.

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, आयर्लंड आणि भारत यांचे ऐतिहासिक संबंध आहेत. ते पुढे घेऊन जाण्यासह दोन्ही देशांच्या आर्थिक विकासासाठी एकत्र काम करू.