सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे दोन वेगवेगळ्या घटनांत ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न

४ विदेशी नागरिक पोलिसांच्या कह्यात !

सीतापूर (उत्तरप्रदेश) – येथे दोन वेगवेगळ्या भागांमध्ये ख्रिस्त्यांकडून हिंदूंंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यासाठी एका ठिकाणी ब्राझिल येथून ४ लोकांना बोलावण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी या ४ विदेशी नागरिकांसह १० लोकांना कह्यात घेतले आहे.

१. सकरन भागात बजरंग दलाचे सुरक्षा प्रमुख आशुतोष वर्मा यांनी पोलिसांत केलेल्या तक्रारनुसार सैदापूर गावामध्ये श्रवणकुमार गौतम याच्या घरी हिंदूंचे धर्मांतर होत असल्याची माहिती मिळाली होती. येथे मोठ्या संख्येने लोक गोळा झाले होते. ते हिंदु धर्माच्या विरोधात बोलत होते. आमचे कार्यकर्ते येथे पोचल्यावर लोकांचे धर्मांतर केले जात असल्याचे आढळून आले. पोलिसांना याची माहिती दिल्यावर पोलिसांनी कारवाई करत आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली.

२. दुसरी घटना शहबाजपूर येथील आहे. येथे जौनपूरच्या रहाणार्‍या डेविड याने ३ वर्षांपूर्वी भूमी खरेदी करून चर्च बांधले होते. येथे बाहेरून लोक येत होती. येथे काही जणांना बोलावून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याची तक्रार नैमिष यांनी केली होती. या चर्चमध्ये ब्राझिल येथून एक महिला आणि ३ पुरुष आले होते. यांत एक पाद्री होता. पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले आहे.

संपादकीय भूमिका 

उत्तरप्रदेशमध्ये हिंदुत्वनिष्ठ भाजपचे सरकार सत्तेत असूनही तेथे उद्दाम ख्रिस्ती हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करतात, हे संतापजनक ! हे रोखण्यासाठी कठोर कायद्यासह त्यांची प्रभावी कार्यवाही आवश्यक !