जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचे ३ आतंकवादी ठार

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील मुंझ मार्ग परिसरात २० डिसेंबरला पहाटे आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात झालेेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे ३ आतंकवादी ठार झाले. यांपैकी दोघांची ओळख पटली आहे, तर तिसर्‍याची ओळख पटवण्याची प्रक्रिया चालू आहे.

त्यांपैकी लतीफ लोन हा शोपिया येथील असून त्याचा पुराण कृष्ण भट या काश्मिरी हिंदूच्या हत्येमध्ये सहभाग होता. घटनास्थळावरून एक एके-४७ रायफल आणि दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत.