गुजरातमध्ये ४५ हिंदूंनी बौद्ध धर्म स्वीकारला !

धर्मांतराची जिल्हाधिकारी चौकशी करणार

महिसागर (गुजरात) – गुजरातच्या महिसागर, पंचमहाल आणि खेडा या जिल्ह्यांतील  एकूण ४५ जणांनी हिंदु धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांनी कोणत्याही प्रलोभनांविना धर्मांतर केल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी प्रशासनाकडून संमतीही मागण्यात आली होती. या धर्मांतराची आता जिल्हाधिकार्‍यांकडून चौकशी होणार असल्याची समजते. महिसागरच्या जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले की, जिल्ह्यातील २९ जणांनी धर्मांतराच्या अनुमतीसाठी अर्ज केले होते. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीमुळे या अर्जांची छाननी होऊ शकली नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल.

संपादकीय भूमिका

देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्यानेच अशा घटना घडत आहेत. केंद्र सरकार कायदा कधी करणार ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे !