समाजवादी पक्षाचे धर्मांध नेते आझम खान हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करतात, हे प्रशासनाला लज्जास्पद !

आझम खान

‘मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील १२ कुटुंबांतील ८० सदस्यांनी नुकताच इस्लामचा त्याग करून हिंदु धर्मात ‘घरवापसी’ (पुनर्प्रवेश) केली. बघरा ब्लॉकमध्ये असलेल्या ‘योग साधना आश्रमा’चे यशवीरजी महाराज यांनी प्रत्येकाला गंगाजलाने शुद्ध करून सर्वांच्या गळ्यात यज्ञोपवित घालून पवित्र केले. नंतर गायत्री मंत्राचे उच्चारण करून आणि यज्ञात आहुती देऊन सर्वांना इस्लाममधून हिंदु धर्मात पुनर्प्रवेश दिला. या लोकांनी समाजवादी पक्षाचे धर्मांध नेते आझम खान यांच्यावर आरोप करत म्हटले, ‘१२ वर्षांपूर्वी आझम खान यांनी आमचे बळजोरीने धर्मांतर केले होते. आमची भूमी आणि मालमत्ता आझम खान यांच्या गुंडांनी बळकावल्या आहेत.’’ (१३.१२.२०२२)