रात्री महिलांना बाहेर असुरक्षित वाटणे, हे केरळ सरकारला लज्जास्पद !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘कोझिकोड (केरळ) वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना रात्री साडेनऊ वाजल्यानंतर वसतीगृहातून बाहेर जाण्यास आणि आत येण्यास मनाई करण्यात आली होती. याविरोधात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना केरळ उच्च न्यायालयाने ‘रात्री घाबरण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाला रात्री फिरणे सुरक्षित वाटले पाहिजे, अशी व्यवस्था सरकारने निर्माण करावी’, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला फटकारले.’ (९.१२.२०२२)