भारत आणि चीन यांनी सीमावाद सोडवण्यासाठी चर्चा करावी ! – अमेरिका

व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरीन जीन-पियरे

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिका भारत-चीन यांच्या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये झालेल्या झटापटीनंतर भारत आणि चिनी सैनिक लगेचच बाजूला झाले, याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही दोन्ही देशांनी द्विपक्षीय चर्चा करावी, या मताचे आहोत. भारत आणि चीन यांनी सीमावाद सोडवण्यासाठी चर्चा करावी, अशी आमची इच्छा आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरीन जीन-पियरे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संपादकीय भूमिका

भारताने चीनशी चर्चा करण्यात वेळ वाया न घालवता, त्याला समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर देणे आवश्यक !

चीन आमच्या सहकार्‍यांच्या विरोधात आक्रमक होत असला, तरी आम्ही त्यांच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध ! – पेंटगॉन

पेंटगॉनचे माध्यम सचिव पॅट रायडर

अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय असणार्‍या ‘पेंटगॉन’नेही या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पेंटगॉनचे माध्यम सचिव पॅट रायडर यांनी सांगितले की, आम्ही आमच्या सहकार्‍याची सुरक्षा निश्‍चित करण्याच्या कटीबद्धतेवर कायम रहाणार आहोत. भारतने ज्या  प्रकारे स्थितीला नियंत्रित केले आहे त्या प्रयत्नांचे आम्ही पूर्ण समर्थन करतो. आम्ही भारत आणि चीन सीमेवर चालणार्‍या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. चीन कशा प्रकारे त्याच्या सैनिकांना सीमेवर तैनात करत आहे, हे जगाला ठाऊक आहे. चीन हा अमेरिका आणि त्याचे सहकारी यांच्या विरोधात आक्रमक होत आहे. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर भारताच्या व्यक्तीरिक्त अन्य देशांसमोरही चीन आव्हान निर्माण करत आहे. हिंदी महासागरात चिनी सैन्याची उपस्थितीही चिंतेचा विषय बनला आहे.

संपादकीय भूमिका

युक्रेन अशाच प्रकारे अमेरिकेवर विसंबून राहिला; मात्र रशियाने युद्ध पुकारल्यावर अमेरिकेने त्याला साहाय्य केले नाही. त्यामुळे भारताने  पेंटगॉनच्या वक्तव्यावर विश्‍वास ठेवून अमेरिकेवर कधीही विसंबून राहू नये !