देहली येथील कु. मनीषा माहुर यांना आलेल्या अनुभूती

कु. मनीषा माहुर

१. शिबिराच्या कालावधीत श्रीकृष्णाला भावप्रयत्न करण्याविषयी विचारणे

१ अ. शिबिराच्या कालावधीत प्रतिदिन सकाळी श्रीकृष्णाला सूक्ष्मातून ‘भावाचे प्रयत्न कसे करू ?’, असे विचारल्यावर त्याने ‘श्रीकृष्णाला सतत बोलावत रहायचे आणि आनंद अनुभवायचा’, असा प्रयत्न करायला सांगणे : ‘२५ ते २८.६.२०२२ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शिबिर झाले. त्या वेळी मी प्रतिदिन सकाळी सूक्ष्मातून श्रीकृष्णाला ‘आज मी कोणता भाव ठेवून साधनेचे प्रयत्न करू ?’, अशी प्रार्थना करत होते. शिबिराच्या शेवटच्या दिवशी श्रीकृष्णाने सूक्ष्मातून मला सांगितले, ‘आज तू आनंद अनुभवायचा आहेस.’ तेव्हा त्याने मला ‘आनंद’ या शब्दाचा अर्थ सांगितला. त्याने मला सांगितले, ‘आ-नंद, म्हणजे ‘कृष्णा ये ना, कृष्णा ये ना’, असे त्याला सतत बोलावत रहायचे.’

१ आ. शिबिरात संत ‘आनंद घ्या’ असे सांगायचे, तेव्हा मला ‘आ-नंद म्हणजे, ‘कृष्णा ये ना, कृष्णा ये ना’, याचे स्मरण होऊन कृतज्ञता वाटायची.

२. देहली सेवाकेंद्रातील ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना वायुतत्त्वाची अनुभूती येणे

एकदा मी देहली सेवाकेंद्रातील ध्यानमंदिरात बसून माझ्या आज्ञाचक्रासमोर हाताचा तळवा ठेवून ‘निर्गुण’ हा नामजप करत होते. तेव्हा काही वेळ ‘माझ्या तळहाताला हवेचा स्पर्श होत आहे आणि ती हवा माझ्या तळहातावर गोल गोल फिरत आहे’, असे मला जाणवत होते.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेनेच मला ही वायुतत्त्वाची अनुभूती आली.’

–  कु. मनीषा माहुर, देहली सेवाकेंद्र, देहली. (१७.७.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक