२१ डिसेंबर या दिवशी नागपूर येथे ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतरबंदी विरोधी कायद्यासाठी राज्यस्तरीय हिंदु जनसंघर्ष मोर्चा !

समस्त हिंदु समाज आणि संघटना यांचा बैठकीद्वारे निर्धार !

नागपूर – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील अखिल भारतीय माहेश्वरी समाज भवन येथे आयोजित समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि विविध समाज संघटना यांची बैठक झाली. या बैठकीत २१ डिसेंबर या दिवशी ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा आणि धर्मांतरबंदी कायदा लागू करावा. यांसाठी शासनावर दबाव निर्माण करून दोन्ही कायदे संमत करण्यात यावेत, या मागणीसाठी नागपूर विधानभवनावर विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या बैठकीला सर्वश्री अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे सचिव आनंद घारे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे समन्वयक निमजे, राष्ट्रीय युवा गठबंधनचे अध्यक्ष राहुल पांडे, पूज्य शदानीदरबार, नागपूरचे राकेश बत्रा, विश्व हिंदु परिषदेचे सुशील चौरासिया आणि शिवाजी राऊत, हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) वैशाली परांजपे, कीर्तनकार भीमराव भुरे, हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डावीकडून समितीचे श्री. अतुल अर्वेन्ला, समितीचे अकोला समन्वयक विद्याधर जोशी, कीर्तनकार भीमराव भुरे, सर्वश्री पुरुषोत्तम बत्रा, राकेश बत्रा, आनंद घारे, श्रीकांत पिसोळकर, अश्विन निमजे, राहुल पांडे आणि अन्य

१. प्रतिवर्षी १५ लाखाहून अधिक हिंदूंचे धर्मांतर होत आहे. दक्षिण भारतात ५०० हून अधिक गावे धर्मांतरित झाली असून तेथे आता वेगळ्या राज्याची मागणी होत आहे. ‘मागील २५ वर्षांत जेवढे धर्मांतराचे कार्य झाले नाही, तेवढे कोरोना काळात झाले’, असे ‘अन्फोल्डिंग वर्ल्ड’ या संस्थेचे अध्यक्ष डेविड रीब्ज यांनी म्हटले आहे. हे असेच चालू राहिले, तर देशाची पुन्हा फाळणी दूर नाही. त्यामुळे महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा लागू करणे आवश्यक आहे.

२. ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून लक्षावधी हिंदु मुलींचे शोषण, धर्मांतर आणि हत्या होत आहेत. महाराष्ट्रातून लक्षावधी मुली बेपत्ता झाल्या आहेत. या विरोधात तक्रारही प्रविष्ट करून घेतल्या जात नाहीत. आमच्या माता-बहिणींच्या सुरक्षेसाठी या विरोधात एकही सक्षम कायदा नसल्याने धर्मांधांचे फावत आहे. यासाठी अन्य ९ राज्यांप्रमाणे कठोर ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा महाराष्ट्रातही लागू करण्यात यावा, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना मिळून करणार आहोत’, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी दिली.

३. १२ ते १८ डिसेंबर या काळात वरील मागणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच समाज यांच्या संयुक्त विद्यमाने या मोर्च्याचे आयोजन केले असून यात अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या वतीने केले जात आहे. मोर्च्यात सहभागी होण्यासाठी ९३७३५३६३७० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.