पाकमध्ये पोलीस शिपायाने हिंदु तरुणाला मारहाण करत त्याची मोटारसायकल हिसकावली !

जेकोबाबाद (पाकिस्तान) – येथे पोलीस शिपाई अहसान शाहिद याने सतीश कुमार या हिंदु मुलाला मारहाण करत त्याची मोटारसायकल हिसकावून घेतली. या पोलीस कर्मचार्‍याला निलंबित करून सतीश कुमार याला न्याय द्यावा, अशी मागणी वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांना करण्यात आली आहे, अशी माहिती ‘हिंदु ऑर्गनायझेशन ऑफ सिंध’ या संस्थेचे संस्थापक संयोजक नारायण दास भील यांनी ट्वीट करून दिली आहे.

संपादकीय भूमिका

पाकमधील असुरक्षित हिंदू !