तालिबानकडे ८०० आत्मघाती आतंकवादी !  

अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांची माहिती !

आय.एस्.आय. आतंकवाद्यांची समर्थक !

अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह

काबुल (अफगाणिस्तान) – सध्या तालिबानकडे ८०० हून अधिक आत्मघी आतंकवाद्यांची टोळी आहे, अशी माहिती अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी दिली.

सालेह यांनी म्हटले की, या सर्वजणांचा बुद्धीभेद करण्यात आला आहे. तालिबानचा एक कमांडर मुल्ला ताजमीर कोहट गेल्या २० वर्षांपासून बाँब निर्मितीचा कारखाना चालवत आहे. काही दिवसांपूर्वी पाकच्या दूतावासावर झालेल्या आक्रमणाची चौकशी संयुक्त राष्ट्रांच्या यंत्रणेकडून करणे आवश्यक आहे. या आक्रमणाची माहिती मिळवण्यासाठी पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.च्या कार्यालयाची चौकशी केली पाहिजे. आय.एस्.आय. आतंकवाद्यांची समर्थक आहे. तालिबानने काबुलवर नियंत्रण मिळवल्यावर आय.एस्.आय.चे प्रमुख तेव्हा अफगाणिस्तानमध्ये पोचले होते.

संपादकीय भूमिका

तालिबान भारताला पाण्यात पहातो. त्यामुळे या आतंकवाद्यांचा भारतात देशविघात कारवाया करण्यासाठी वापर करण्याआधीच भारताने सतर्क होऊन पावले उचलणे आवश्यक !