म्हणून ईश्वराला सनातनचे साधक जवळचे वाटतात।

श्री. अनिल कुलकर्णी

गुरुकृपायोगानुसार साधना करतात, साधक सनातनचे।
त्यांना कुठल्याही गोष्टीची आसक्ती नसते।
अंतिम ध्येय गाठणे, हेच साध्य जीवनाचे।
अन् केवळ ईश्वरप्राप्तीची तळमळ असते।। १।।

सनातनचे साधक अविरत प्रयत्न करतात।
अनिष्ट शक्ती त्यात सतत विघ्ने आणतात।
साधक गुरुसेवा पूर्ण कशी होईल, हेच पहातात।
म्हणून ईश्वराला सनातनचे साधक जवळचे वाटतात।। २।।

सनातनचे आश्रम, म्हणजे आहेत चैतन्याचा स्रोत।
सनातनचे ग्रंथ, म्हणजे आहे ज्ञानाचा झरा।
दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे सत्यनिष्ठ लिखाण।
सनातनमध्ये सर्वांचा उद्देश आहे ईश्वरप्राप्ती।। ३।।

– श्री. अनिल कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के, वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.७.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक