गुरुकृपायोगाच्या माध्यमातून साधना शिकवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘गुरुकृपायोग’ सर्वश्रेष्ठच।
‘भक्तीयोगा’ची तान कंठरवापर्यंतच।
‘ज्ञानयोगा’ची साद आज्ञाचक्रापर्यंतच।
‘शक्तीयोगा’ची धाव गुरुकृपेविना आज्ञाचक्र पार करू शकत नाही।। १।।
ज्ञान-भक्तीच्या भावमधुर अशा आर्त सादेच्या मधुर गुंजारवाने ‘सहस्रदल’ कमल उमलते।
या भक्ती-प्रीतीने देव ‘सौरभाचा अमृतकुंभ’ भक्ताला चाखवतो।
तेव्हा भक्त देवाशी एकरूप होतो।। २।।
– कृष्णपुष्प (पुष्पांजली, आध्यात्मिक पातळी ६० टक्के), बेळगाव, (गुरुपौर्णिमा (देवपौर्णिमा) १३.७.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |