कोडगु (कर्नाटक) येथील हरिहर गाव येथील सुब्रह्मण्यम् मंदिर परिसरात मुसलमानांची दुकाने हटवली !

हिंदु असल्याची खोटी ओळखपत्रे दाखवून थाटली होती दुकाने !

प्रतिकात्मक छायाचित्र

कोडगु (कर्नाटक) – येथील पोन्नंपेटेमधील हरिहर गाव येथील सुब्रह्मण्यम् मंदिराच्या परिसरात अनेक मुसलमानांनी ‘हिंदु’ असल्याची खोटी ओळखपत्रे दाखवून त्यांची दुकाने थाटली होती. आता ती हटवण्यात आली आहेत. यापूर्वी राज्यातील काही मंदिरांच्या ठिकाणी मुसलमान व्यापार्‍यांना दुकाने थाटण्याची अनुमती नाकारण्यात आली होती.

१. दुर्गा वाहिनीच्या जिल्हा समन्वयक असणार्‍या प्राध्यापिका अंबिका यांनी म्हटले की, आता मुसलमान व्यापार्‍यांना मंदिराजवळ व्यवसाय करण्याची अनुमती दिली जाणार नाही. येथे व्यापार करण्यासाठी मुसलमानांना त्यांची ओळख लपवण्याची आवश्यकता नव्हती. ‘ते त्यांची खरी ओळख दाखवून येथे व्यवसाय करू शकतात’, असे आम्ही यापूर्वी सांगूनही त्यांनी ‘हिंदु’ नाव असलेली ओळखपत्रे दाखवून येथे दुकाने थाटली होती. आम्ही सांगूनही त्यांनी असे केल्याने आता आम्ही त्यांना व्यापार करू देणार नाही.

२. कोडगु जिल्ह्यामध्ये मुसलमानांना मंदिराच्या परिसरात दुकाने थाटण्याची अनुमती देण्याच्या विरोधात काही मासांपासून आंदोलन चालू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर येथे आयोजित करण्यात आलेल्या मंदिराच्या मेळ्याच्या संदर्भात येथे मुसलमान व्यापार्‍यांना विरोध होत आहे.

३. विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात बेंगळुरू  महानगर पालिकेला निवेदन देऊन मुसलमान व्यापार्‍यांवर मंदिर परिसरात बंदी घालण्याची मागणी केली आहे.

४. यापूर्वी राज्य सरकारमधील कायदामंत्री जे.सी. माधुस्वामी यांनी या संदर्भात ‘सरकारी नियमानुसार मंदिर प्रशासन व्यपार्‍यांवर बंदी घालू शकते’, असे म्हटले होते. कर्नाटकच्या विधानसभेतही या प्रकरणी चर्चा झाली होती.

संपादकीय भूमिका

  • ओळख लपवून करण्यात येणार्‍या ‘लव्ह जिहाद’नंतर याला कोणता जिहाद म्हणायचे ?
  • ‘अशा दुकानांतून  हिंदूंनी प्रसादाचे, देवाला अर्पण करण्याचे साहित्य घेतांना त्यात धर्मांधांकडून ‘थुंकी जिहाद’नुसार थुंकण्यात आले असेल’, असा संशय कुणाला आल्यास त्यात चुकीचे काय ?