राहुल गांधी यांना कारागृहात डांबा ! – अखिल भारतीय हिंदु महासभा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचे प्रकरण

राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी पंतप्रधानांकडे केली मागणी

नवी देहली – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना अखिल भारतीय हिंदु महासभेने लक्ष्य केले आहे. महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘स्वातंत्र्यसैनिकाचा अवमान करणार्‍या राहुल गांधी यांची सामाजिक आणि राजकीय कृत्ये प्रतिबंधित करून त्यांना कारागृहात डांबण्यात यावे’, अशी मागणी करणारे पत्र लिहिले आहे.

सौजन्य एनएमएफ न्यूज

अ. १९ नोव्हेंबर या दिवशी लिहिलेल्या पत्रात स्वामी चक्रपाणी यांनी सांगितले की, राहुल गांधी मानसिकदृष्ट्या आजारी असून त्यांना आगरा येथे उपचारासाठी ठेवण्यात यावे. जर ते इंग्रजांच्या इशार्‍यावर भारताच्या महान स्वातंत्र्यसैनिकाचा अवमान करत असतील, तर हा मोठा अपराध आहे.

आ. पत्रात पुढे म्हटले आहे की, पुढील वर्षी म्हणजे २६ फेब्रुवारी २०२३ या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५७ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हिंदु महासभा देहलीतील २४, अकबर रोड येथे असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयाच्या समोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेची स्थापना करणार आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी ‘अकबर रोड’चे नामकरण ‘वीर सावरकर रोड’ करण्याची मागणी केली असून त्यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्याचा आग्रहही करण्यात आला आहे.