अभिनेत्री रिचा चढ्ढा यांंनी गलवान येथील वीरगतीला प्राप्त झालेल्या सैनिकांचा केला अवमान !

टीका होऊ लागल्यावर रिचा यांची क्षमायाचना !

उजवीकडे अभिनेत्री रिचा चढ्ढा

नवी देहली – अभिनेत्री रिचा चढ्ढा यांनी भारतीय सैन्याचा अवमान करणारे ट्वीट केल्याने त्यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका होत आहे. यानंतर रिचा यांनी क्षमायाचना केली आहे. ‘माझा कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. माझ्या शब्दांमुळे अनावधानाने जरी कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी क्षमा मागते’, असे रिचा चढ्ढा यांनी म्हटले आहे.

१. दोन दिवसांपूर्वी भारतीय सैन्याच्या उत्तर कमांडचे प्रमुख उपेन्द्र द्विवेदी यांनी ‘जर सरकारने आदेश दिला, तर पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यास आम्ही सिद्ध आहोत’, असे विधान केले होते. हे विधान एका ट्विटर खात्याने शेअर केले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना रिचा चढ्ढा यांनी ‘गलवान सेज हाय !’ (गलवान म्हणतो हाय !) असे लिहिले.

२. दोन वर्षांपूर्वी लडाखच्या गलवान खोर्‍यामध्ये भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य यांच्यात संघर्ष होऊन त्यात २० भारतीय सैनिक वीरगतीला प्राप्त झाले होते. त्यांचा अशा प्रकारे उल्लेख करून भारतीय सैन्य सक्षम नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न रिचा यांनी केला.

संपादकीय भूमिका

अशांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !