पाद्य्राकडून प्रार्थनासभेत उपस्थित हिंदूंना घरातील देवतांची चित्रे फेकून देण्याचे आवाहन !

डेहराडून (उत्तरप्रदेश) येथे पाद्री रवि फ्रान्सिस याच्या विरोधात हिंदूंचे धर्मांतर केल्याचा गुन्हा नोंद

डेहराडून (उत्तरप्रदेश) – येथे पाद्री रवि फ्रान्सिस याच्यावर हिंदूंचे धर्मांतर केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पाद्री फ्रान्सिस प्रार्थनासभेमध्ये हिंदूंच्या देवतांविषयी अश्‍लाघ्य विधाने करत होता. घरामध्ये असणारी देवतांची चित्रे फेकून देण्यास तो उपस्थित हिंदूंना सांगत होता. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत. ‘पाद्री रवि फ्रान्सिस हिंदूंना प्रार्थनेच्या नावाखाली बोलावून त्यांचे धर्मांतर करत आहे’, असा आरोप करत हिंदूंच्या संघटनांनी येथे निदर्शने केली होता. याची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोचले आणि रवि याला कह्यात घेतले. त्याची चौकशी करून त्याला सोडून दिले; मात्र या प्रकरणी गुन्हा नोंदवला.

छत्रपाल सिंह यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रार्थनासभेत उपस्थित हिंदूंचे तो धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा मी त्याला विरोध केला, तर मला मारहाण करण्यात आली. फ्रान्सिस याने आतापर्यंत ५० ते ६० जणांचे धर्मांतर केले आहे.

संपादकीय भूमिका

देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याचे अपलाभ ख्रिस्ती घेत आहेत, हे सरकारला कधी कळणार ?