खंडवा (मध्यप्रदेश) येथे मौलवीकडून हिंदु तरुणाचे धर्मांतर !

बेरोजगारीचा अपलाभ उठवला !

गुन्हा नोंद होताच मौलवी फरार !

खंडवा (मध्यप्रदेश) – येथील अक्षय नावाच्या एका हिंदु तरुणाला विविध आमिषे दाखवून धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्यात आले. या घटनेच्या ५ मासांनंतर या तरुणाने एका मशिदीच्या मौलवीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. बेरोजगारीमुळे अस्वस्थ असतांना मौलवीने इस्लाम पंथ स्वीकारण्यासाठी बुद्धीभेद केल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे.


या तरुणाचे नाव अक्षय गौड असून त्याने धर्म पालटताच त्याचे नाव पालटून महंमद फहीम असे ठेवले. त्याने नमाजपठणापासून इस्लामचा मार्ग स्वीकारणे चालू केले. कुटुंबीय आणि मित्र यांनी त्याची समजूत काढल्यानंतर त्याने गंगाजल प्राश्न करून पुन्हा हिंदु धर्म स्वीकारला. पीडित तरुणाने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मौलवीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. सध्या मौलवी फरार आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

हिंदूंना धर्मशिक्षण दिल्यास त्यांच्यातील धर्माभिमान वाढेल आणि ते कुणाच्याही भूलथापांना बळी पडणार नाहीत !