मध्यप्रदेशात वसतीगृहांमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदु विद्यार्थ्यांचे धर्मांतर !

  • १० जणांविरुद्ध गुन्हा नोंद !

  • यापूर्वी झाले होते तिघा हिंदु मुलांचे इस्लाममध्ये धर्मांतर !

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील शिशुगृहांमध्ये हिंदु मुलांचे इस्लाममध्ये धर्मांतर झाल्यानंतर आता राज्यात मिशनरी संचालित वसतीगृहांमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदु विद्यार्थ्यांचे धर्मांतर केले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. ‘नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स’ या संघटनेचे अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांनी या संदर्भात दमोह पोलीस ठाण्यात १० जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

कानूनगो यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने अनेक ख्रिस्ती मिशनर्‍यांवर लक्ष ठेवले होते. या काळात ख्रिस्ती मिशनर्‍यांचे अनेक अपप्रकार उघडकीस आले. सर्वप्रथम या पथकाने बेथलहेम बायबल परिसरातील वसतीगृहाला भेट दिली. या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून माहिती घेतल्यानंतर तेथे हिंदु मुलांचे धर्मांतर होत असल्याचे समोर आले. तेथून हे पथक भिदावरी गावातील मिशनरी संचालित वसतीगृहात पोचले. तेथील बहुसंख्य विद्यार्थी हिंदु होते. तेथे विद्यार्थ्यांना ख्रिस्ती पंथाचे शिक्षण दिले जात असल्याचे उघड झाले.

यापूर्वी राज्यातील रायसेन जिल्ह्यातील एका बालगृहात ३ हिंदु मुलांचे इस्लाममध्ये धर्मांतर केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

संपादकीय भूमिका

मध्यप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असल्याने तेथे हिंदूंचे धर्मांतर होऊ नये, अशी अपेक्षा ! यासह हिंदु मुलांचे बलपूर्वक धर्मांतर करणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी हिदूंची मागणी आहे !