इस्तंबुल (तुर्कीये) येथे ९ व्या जागतिक हलाल प्रदर्शनाचे आयोजन !

इस्तंबुल (तुर्कीये) – येथे येत्या २४ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत इस्लामी देशांच्या संघटनेने ८ वे जागतिक हलाल शिखर संमेलन आणि ९ वे हलाल प्रदर्शन आयोजित केले आहे. हलाल उद्योगासाठी हे प्रदर्शन सर्वांत मोठा मंच आहे.

या प्रदर्शनात जगभरातील २०० कोटी लोकांना खाद्यपदार्थ, औषधे, कॉस्मेटिक वस्तू, पर्यटन आदींच्या संदर्भात तुर्कीयेकडे आकर्षित करण्यात येणार आहे. या संमेलनास जगभरातून ४० सहस्र जण उपस्थित रहाण्याची शक्यता आहे.