(म्हणे) ‘हिंदु शब्द विदेशी असून त्याचा अर्थ फारच घाणेरडा आहे !

काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सतीश जारकीहोळी यांचा शोध !

बेळगाव – ‘हिंदु’ हा शब्द पर्शियन आहे. तचा अर्थ फारच घाणेरडा आहे. तुम्ही संकेतस्थळांवर याविषयी माहिती घेऊ शकता. काही जण या विदेशी शब्दांवरून गोंधळ का घालत आहेत, हे मला समजत नाही. एक विदेशी शब्द आमच्यावर का थोपला जात आहे, याविषयी व्यापक चर्चा झाली पाहिजे, असे विधान काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी निपाणी येथे एका कार्यक्रमात केले. या विधानाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित झाला आहे.

संपादकीय भूमिका

‘जो हीन गुणांचा नाश करतो तो हिंदु’, असे भारतीय धर्मग्रंथांमध्ये ‘हिंदु’ शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. याचा अभ्यास सतीश जारकीहोळी यांनी केलेला नाही, हेच त्यांच्या विधानातून लक्षात येते !