१. पहाटे पडलेल्या स्वप्नात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काही साधकांना तीन ठिकाणी नेणे; मात्र ‘ते काय सांगत आहेत ?’, हे न कळणे
‘मार्च २०२२ मध्ये एकदा पहाटे ५.३० – ६ वाजण्याच्या सुमारास मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात मला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले रामनाथी आश्रमातील काही साधक आणि अन्य ठिकाणचे काही साधक यांना कुठेतरी घेऊन जात आहेत’, असे दिसले. परात्पर गुरु डॉक्टरांनी सर्वांत प्रथम आम्हा सर्व साधकांना एके ठिकाणी नेले. ते ठिकाण उंच डोंगरावर होते. तेथे त्यांनी आम्हा साधकांना एका उंच ठिकाणी उभे रहाण्यास सांगितले. त्यानंतर ते समोर असलेल्या एका ठिकाणी गेले. तेथे गेल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला काही सांगितले. ‘त्यांनी काय सांगितले ?’, हे मला जाग आल्यावर आठवले नाही. त्यानंतर ते आम्हाला अशाच अन्य दोन ठिकाणी घेऊन गेले.
२. परात्पर गुरु डॉक्टरांनी चौथ्या ठिकाणी नेल्यावर श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे दर्शन होणे
२ अ. ‘डोळे मिटून काय जाणवते ?’, ते अनुभवत असतांना परात्पर गुरु डॉक्टर उभे असलेल्या ठिकाणाकडून उष्णता येत असल्याचे जाणवणे : शेवटी ते आम्हाला चौथ्या ठिकाणी घेऊन गेले. आम्ही सर्व साधक उंचावर उभे होतो आणि परात्पर गुरु डॉक्टर समोर असलेल्या एका ठिकाणी उभे राहून आम्हाला काही सांगत होते. त्यांनी ‘डोळे मिटून तेथे काय जाणवते ?’, ते अनुभवण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही सर्व साधकांनी अनुभवण्यास आरंभ केला. तेव्हा मला प्रथम परात्पर गुरु डॉक्टर उभे होते, तेथून उष्णता येत असल्याचे जाणवले.
२ आ. स्वप्नातच डोळे उघडल्यावर परात्पर गुरु डॉक्टर उभे असलेल्या ठिकाणी उंच दगडी खांब दिसून तेथे बराच वेळ ज्वाळा धुमसतांना दिसणे : मी स्वप्नातच डोळे उघडले. परात्पर गुरु डॉक्टर उभे असलेल्या जागेत अनेक उंच दगडी खांब होते. खांबांच्या मधली जागा रिकामी होती. मला त्या संपूर्ण जागेत ज्वाळा दिसल्या. ज्वाळा बराच वेळ धुमसत होत्या. त्यात ‘परात्पर गुरु डॉक्टर कुठे आहेत ?’, ते दिसत नव्हते.
२ इ. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या सुंदर मूर्तींचे दर्शन होऊन झोपेतच हात जोडले जाणे : काही वेळाने त्या ज्वाळा अल्प होत जाऊन तेथे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे दर्शन झाले. विठ्ठलाची मूर्ती काळ्या रंगाची होती. मूर्ती अतिशय देखणी होती. ‘तिच्याकडे पहातच रहावे’, असे वाटत होते. मूर्तीचे डोळे, नाक, कान असे एकेक अवयव अतिशय कोरीव होते. रुक्मिणीची मूर्तीही तितकीच सुंदर होती. दोन्ही मूर्ती दिसू लागल्यावर सभोवतालचे वातावरण फिकट केशरी रंगाचे झाले. मूर्ती पाहून माझे हात आपोआप जोडले गेले आणि मला जाग आली.
३. ‘श्री विठ्ठलामध्ये स्थितीची क्षमता ८० टक्के असल्याने आपत्काळानंतर येणार्या स्थितीच्या देवतेचे दर्शन परात्पर गुरु डॉक्टरांनी दिले’, असे वाटणे
जाग आल्यावरही माझे दोन्ही हात जोडलेले होते. मला आनंद वाटत होता. ‘परात्पर गुरु डॉक्टर हेच विठ्ठल आहेत’, असे मला वाटत होते. विठ्ठल हा स्थितीचा देव असल्याचे मी वाचले होते. त्यानंतर मी ‘विष्णु आणि विष्णूची रूपे’ हा सनातन निर्मित ग्रंथ वाचला. त्यात ‘विठ्ठल’ हे श्रीविष्णूचे एक रूप असून त्याच्यात ५० टक्के विष्णुतत्त्व; प्रकट शक्ती ५० टक्के; उत्पत्ती, स्थिती आणि लय यांपैकी स्थितीची क्षमता ८० टक्के असल्याचे दिले आहे. त्यामुळे ‘सध्याच्या आपत्काळानंतर असलेल्या स्थितीच्या देवतेचे दर्शन परात्पर गुरु डॉक्टरांनी दिले’, असे मला वाटले.’
– सुश्री (कु.) राजश्री सखदेव, (वय ५६ वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.४.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |