पू. (कै.) चत्तरसिंग इंगळे यांची धाकटी सून सौ. शालिनी नरेंद्र इंगळे यांनी व्यक्त केलेले मनोगत !

दुर्ग (छत्तीसगड) येथील सनातनचे १८ वे संत पू. (कै.) चत्तरसिंग इंगळे (वय ९२ वर्षे) यांच्या देहत्यागाला आज १ मास होत आहे. त्या निमित्ताने…

पू. (कै.) चत्तरसिंग इंगळे

परम पूज्यांच्या चरणी नमस्कार,

भगवंताच्या चरणी कोटीशः वंदन

सौ. शालिनी नरेंद्र इंगळे

१. माझ्या सासर्‍यांचा स्वभाव प्रेमळ होता.

२. ‘दानधर्म करणे, शारीरिक, सामाजिक आणि आर्थिक या स्तरांवर सेवा करणे’, याविषयी ते नेहमी उदार मताचे होते. त्यांचा साहाय्याचा हात नेहमी पुढे असायचा.

३. वर्ष २००१ मध्ये त्यांनी सनातन धर्म स्वीकारला. त्यांनी त्यांच्या घरातील वरचा माळा ‘सनातन संस्थेला’ सेवेसाठी दिला. तेव्हापासून त्यांची आध्यात्मिक प्रगती झाली. त्यांच्यातील स्वभावदोषांचे निर्मूलन झाले.

– कृतज्ञ,

सौ. शालिनी नरेंद्र इंगळे, दुर्ग, छत्तीसगड. (९.१०.२०२२)