जत (जिल्हा सांगली) – काही फटाक्यांच्या वेष्टनांवर हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे मुद्रित केली जातात. यामुळे असे फटाके फोडल्यावर त्यांचा अवमान होतो. अशा फटाक्यांची विक्री जत येथील बाजारपेठांमध्ये केली जात आहे. देवतांची विटंबना झाल्यास भा.द.वि. २९५ (अ) नुसार दंडनीय अपराध आहे, तसेच फटाक्यांवर अशी चित्रे मुद्रित करणे, हे केंद्रशासनाच्या व्यापार चिन्ह कायदा १९९९ मधील कलम ९(२) नुसार गुन्हा आहे. तरी जत येथे फटाक्यांवरील वेष्टनाद्वारे होणारी हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखावी, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जत पोलीस ठाण्यात निवेदन देऊन करण्यात आली.