पुणे – घरातील देवाच्या मूर्ती, भग्नमूर्ती, पोथ्या, धार्मिक ग्रंथ, टाक, देव्हारे, प्रतिमा अशा स्वरूपाच्या देवतांच्या संबंधित जुन्या वस्तू गोळा करण्याचा उपक्रम नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी नाशिकच्या ‘संपूर्णम् संस्थे’च्या सहकार्याने कोथरूड परिसरामध्ये राबवला. यामध्ये ५०० जणांनी या वेळी वस्तू स्वत:हून जमा केल्या. शहरातील धनकवडी, कात्रज, बाणेर, बावधन, पिंपळे सौदागर, कल्याणीनगर, वाघोली आदी परिसरांतील लोकांनी वस्तू जमा केल्या. काहींनी विविध गावांतून ‘पार्सल’ पाठवून या उपक्रमात सहभाग नोंदवला. जमा झालेले सर्व साहित्य २ टेंपोमध्ये भरून नाशिककडे रवाना करण्यात आले.