कोरोना महामारीमुळे घोषित केलेल्या दळणवळण बंदीच्या काळात सनातन संस्थेने चालू केलेल्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगात सहभागी होणार्‍या जिज्ञासूंचे मनोगत !

वर्ष २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे सर्वत्र दळणवळण बंदी चालू झाली. त्यानंतर सनातन संस्थेच्या वतीने समाजाला अध्यात्मशास्त्राविषयी मार्गदर्शन करण्यासाठीऑनलाईनसाधना सत्संगांना आरंभ करण्यात आला. या सत्संगांत विविध राज्यांतील अनेक जिज्ञासू नियमित सहभागी होऊ लागले आणि त्यांनी सत्संगांत सांगितल्याप्रमाणे साधना करणे चालू केले. साधनेला आरंभ केल्यानंतर जिज्ञासूंचे मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती त्यांच्या शब्दांत येथे दिल्या आहेत.

. मध्यप्रदेश

. सौ. स्वाती शेकटकर, जबलपूर

. ‘ऑनलाईनसत्संगांतून आचारधर्माला असलेला तर्कसंगत आधार आणि त्यामागील वैज्ञानिक पैलू यांचा बोध झाल्यामुळे सनातन संस्कृतीवरील श्रद्धा अन् अभिमान वाढणे :याऑनलाईनसत्संगांच्या रूपात आमच्या घरी ज्ञानगंगाच आली आहे. आपण परंपरेने चालत आलेल्या आचारधर्माचे पालन करत असतो. त्याला असलेला तर्कसंगत आधार आणि त्यामागील वैज्ञानिक पैलू यांचा बोध मला या सत्संगांतून होत आहे. त्यामुळे मी मुलांना त्याविषयी चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकत आहे आणि माझी सनातन संस्कृतीवरील श्रद्धाही दृढ होऊन मला तिचा अभिमान वाटत आहे. ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अपार कृपा आहे. .पू. गुरुदेव आणि सर्व सद्गुरु यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

. सौ. अर्चना जोशी, भोपाळ

. कुलदेवीचा नामजप केल्यावर एका रात्री आलेले संकट दूर होणे :एकदा मध्यरात्री माझ्या कुटुंबावर एक संकट आले होते. त्या रात्रीच मी आमच्या कुलदेवीचा नामजप चालू केला होता. माझ्या समवेत माझ्या दोन्ही मुलींनीही कुलदेवीचा नामजप केला. सकाळ होईपर्यंत त्या समस्येवर पुष्कळ चांगला उपाय मिळाला. त्यामुळे आमच्या कुटुंबाला पुष्कळ शांतता मिळाली. हा नामजपाचाच चमत्कार होता.

. मुलीला पुष्कळ ताप आल्यामुळेबोर्डाच्या परीक्षेच्या ठिकाणी जाऊनड्युटी (कामकाज) करणे शक्य नसणे आणि रात्री कुलदेवीचा नामजप केल्यावर परीक्षाच रहित झाल्याची बातमी कळणे : मला आणखी एक अनुभूती आली. एकदा मलाबोर्डाच्या परीक्षेच्या वेळीड्युटी (कामकाज) लागली होती. दुसर्याच दिवशी माझ्या मुलीला पुष्कळ ताप आला. त्यामुळे मी परीक्षेच्या कामावर जाण्यास असमर्थ होते. मी शाळेत भ्रमणभाष केल्यावर परीक्षा अधिकार्याने मला सांगितले, ‘‘तुमच्याऐवजी दुसरे कुणी काम करायला सिद्ध झाले, तरच तुमचीड्युटीरद्द करता येईल !’’ मी माझ्या मैत्रिणींना भ्रमणभाष करून विचारले; पण कोणीही काम करण्यास सिद्ध झाले नाही. त्या रात्री मी कुलदेवीचा नामजप केला. दुसर्या दिवशी सकाळी उठून मी वर्तमानपत्र वाचले, तर ती परीक्षाच रहित करण्यात आली होती. हा नामजपाचाच चमत्कार होता !’

. सौ. नीता कुशवाहा, ग्वाल्हेर

. सत्संगात सांगितल्यानुसार नामजप करणे :सत्संगातील धर्मशास्त्र सांगणार्या कृती ऐकून मी त्या माझ्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करते. मीश्री गुरुदेव दत्त आणिश्री कुलदेवतायै नमः हे दोन्ही नामजप करत आहे. त्यामुळे मला सकारात्मकता जाणवत आहे. मी आमचा परिवार आणि मित्रमैत्रिणी यांच्याशी याविषयी चर्चा करते.

. विवाहानंतर वर्षे अनेक उपचार करूनही गर्भ रहाणे आणि नामजप करू लागल्यानंतर गर्भधारणा होणे : माझ्या विवाहाला आता दोन वर्षे पूर्ण होतील. मलाथायरॉइडग्रंथी आणिपी.सी..डी.’ (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोमगर्भाशयातील बीजांड कोशासंबंधी) यांची समस्या आहे. मी आधुनिक वैद्यांकडे जाऊन यांवरील उपचारांसाठी पुष्कळ पैसे व्यय केले; परंतु आम्हाला संतानप्राप्ती झाली नाही. आता दत्तगुरु आणि कुलदेवी यांच्या कृपेने मी मासांची गर्भवती आहे.

. अकस्मात् प्रकृती बिघडल्यानेसोनोग्राफीही तपासणी केल्यावर गर्भ स्वस्थ असल्याचे दिसून येणे : सर्व काही व्यवस्थित चालू असतांनाच मागील आठवड्यात अकस्मात् माझी प्रकृती बिघडली. आधुनिक वैद्यांनी मलासोनोग्राफीही तपासणी करायला सांगितले. मी पूर्ण दिवसश्री गुरुदेव दत्त आणि इष्ट देवतेचा नामजप केला. सुदैवानेसोनोग्राफीमध्ये गर्भ एकदम स्वस्थ असल्याचे दिसून आले. ‘यापुढेही सर्व काही चांगले रहावे, अशी मी ईश्वराला प्रार्थना करते.’ 

. सौ. मंदिरा हळवे, भोपाळ

. सत्संगामुळे मन सकारामक होणे :गेल्या   मासांपासून मी नियमित सत्संग ऐकत आहे. सनातन संस्थेद्वारे दिली जाणारी माहिती उद्बोधक आहे. या सत्संगांमुळे माझ्या मनातील बर्याच शंका आणि संभ्रम दूर झाले आहेत. मी नामजप, पूजापाठ इत्यादी कृती विधीवत् करून आनंद अन् सकारात्मकता अनुभवत आहे, उदा. मन शांत रहाणे, समस्यांच्या निवारणाची क्षमता वाढणे, इत्यादी.’

. श्री. नीरज भालेराव, भोपाळ

. सत्संगामुळे दिवसभर उत्साही वाटणे : मीऑनलाईनसत्संगाची पुष्कळ प्रतीक्षा करतो. सत्संगात मला पुष्कळ नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आता माझा पूजा करण्याचा उत्साह वाढला असून मला दिवसभर उत्साही वाटते.’

. सौ. माधवी परांजपे, जबलपूर

. सत्संगामुळे स्वतःच्या स्वभावदोषांची जाणीव होणे :सत्संगात नामजपाचे महत्त्व लक्षात आल्यामुळे मी नामजपाला आरंभ केला आहे. त्यामुळे माझा आत्मविश्वास आणि गुरूंप्रती शरणागतभाव वाढला आहे. मला माझे स्वभावदोषही लक्षात आले आहेत. आता माझ्याकडून चुका झाल्यास मी त्वरित संबंधित साधकाची क्षमा मागते.’

. सौ. अरुणा परमार, इंदूर

. सत्संग ऐकू लागल्यापासून स्वतःत पुष्कळ पालट झाल्याचे जाणवणे :मी सनातन संस्थेच्या संपर्कात आहे, हे सांगतांना मला अतिशय अभिमान वाटतो. कोरोनाच्या काळात आम्ही सर्व जण आपापल्या घरांत अडकून पडलो होतो. अशा वेळी सनातन संस्थेच्याऑनलाईनसत्संगांतून दिलेल्या सकारात्मक विचारांमुळे या गंभीर रोगाशी लढण्यासाठी आम्ही सिद्ध झालो. मी सत्संगात सहभागी होऊ लागल्यापासून माझ्यात पुष्कळ पालट झाले आहेत. आता मी कधी नकारात्मक विचार करत नाही. दुसर्यांना साहाय्य करण्यास मी नेहमी तत्पर असते. सत्संग ऐकतांना मला माझ्या अंतर्मनातून चांगले जाणवते.’

. सुश्री उषा सेन, भोपाळ

. सत्संगामुळे साधनेचे प्रयत्न वाढणे :मी नेहमीऑनलाईनसत्संग ऐकते. त्यामुळे माझे साधनेचे प्रयत्न वाढत आहेत. नामजप केल्यामुळे माझ्या मनाला पुष्कळ शांती मिळाली. मी या सत्संगाची पुष्कळ आतुरतेने वाट पहाते.

. श्री. सुशील खनंग, जबलपूरऑनलाईनसत्संगामुळे मला पुष्कळ चांगले वाटले आणि माझ्या मनाला शांतीची अनुभूती आली.’

(क्रमशः)

(सर्व सूत्रांचा दिनांक वर्ष २०२०)

यापुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/620194.html
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक