‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे लाभलेला अभूतपूर्व प्रतिसाद !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा आणि संकल्प यांमुळे वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे समाजातून ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ‘देवाने या अभियानाचे पूर्वनियोजन आधीच करून ठेवले होते. आम्ही केवळ निमित्त होतो’, असे आम्हाला अनुभवता आले. या अभियानाला विविध स्तरांतून मिळालेल्या प्रतिसादातील काही उत्स्फूर्त प्रतिसाद पुढे दिला आहे.

 

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा !

१८ सप्टेंबर २०२२ या दिवशीच्या दैनिकात विद्यालये, महाविद्यालये आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वाचक यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद वाचला होता. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.

लेखाचा भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा  : https://sanatanprabhat.org/marathi/613376.html

४. ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’मधील क्षणचित्रे !

सौ. प्राची जुवेकर

४ अ. ‘मां गायत्री विद्यालया’चे प्राचार्य मोहन श्रीवास्तव यांनी ‘सनातन संस्थे’चे संस्कारांविषयीचे ग्रंथ त्यांच्या विद्यालयाच्या अभ्यासक्रमात ठेवण्याची इच्छा व्यक्त करणे : ‘मां गायत्री विद्यालया’चे प्राचार्य श्री. मोहन श्रीवास्तव हे गायत्री परिवाराशी जोडलेले आहेत. त्यांना सनातन संस्था करत असलेले बालसंस्काराचे कार्य फार आवडले. त्यांनी लगेच त्यांच्या विद्यालयाच्या अभ्यासक्रमामध्ये सनातन संस्थेचे बालसंस्काराच्या संदर्भातील ग्रंथ घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यासाठी आम्हाला भेटण्यास सांगितले.

४ आ. ‘अटलबिहारी वाजपेयी उच्च महाविद्यालया’चे श्री. रत्नेश पांडे यांनी ‘हे ग्रंथ लिहिणारी व्यक्ती दिव्य असून सामान्य व्यक्ती असे लिहू शकत नाही !’, असे गौरवोद्गार काढणे : ‘अटलबिहारी वाजपेयी उच्च महाविद्यालया’चे श्री. रत्नेश पांडे यांना सनातन संस्थेच्या बालसंस्कार ग्रंथांच्या संदर्भात सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘हे ग्रंथ लिहिणारी व्यक्ती दिव्य आहे. सामान्य व्यक्ती असे लिहू शकत नाही ! विश्वविद्यालयाच्या पाठ्यक्रमांतून असा अभ्यासक्रम पूर्ण करून जे विद्यार्थी शिकून बाहेर येतील, ते चारित्र्यवान असतील. हे विद्यार्थी स्वामी विवेकानंदांसारखेच असतील.’’

४ इ. ‘उदय प्रताप माध्यमिक विद्यालया’चे मुख्याध्यापक डॉ. रमेश प्रताप सिंह यांनी ‘तुम्ही युवकांसाठी आवश्यक असलेले उपक्रम महाविद्यालयामध्ये घेऊ शकता’, असे सांगणे : ‘उदय प्रताप माध्यमिक विद्यालया’चे मुख्याध्यापक डॉ. रमेश प्रताप सिंह यांना सनातन संस्थेविषयी सांगून ग्रंथ दाखवल्यावर ते प्रभावित झाले. ते म्हणाले, ‘‘आजच्या तरुण पिढीसाठी या संस्कारांची आवश्यकता आहे. तुम्ही चांगले कार्य करत आहात. महाविद्यालयामध्ये युवकांसाठी जे उपक्रम आवश्यक आहेत, ते तुम्ही घेऊ शकता.’’

४ ई. ‘महात्मा गांधी विद्यापिठा’च्या सांस्कृतिक विभागाचे श्री. दीपकजी यांनी ‘वर्ष २०२२ मध्ये विद्यालयामध्ये ‘एम.ए. विथ हिन्दुइझम’ (हिंदुत्वाविषयी पदव्युत्तर शिक्षण) हा नवीन अभ्यासक्रम चालू होणार असल्याने ‘सनातन संस्थे’चे ग्रंथ या अभ्यासक्रमासाठी उपयुक्त आहेत’, असे सांगणे : ‘महात्मा गांधी विद्यापिठा’चे कुलगुरु श्री. ए.के. त्यागी यांना भेटल्यावर त्यांनी ‘सनातन संस्था’ आणि सनातनचे आश्रम यांविषयीची माहिती जिज्ञासेने ऐकून घेतली. विद्यापिठाच्या सांस्कृतिक विभागाचे श्री. दीपकजी म्हणाले, ‘‘वर्ष २०२२ मध्ये आमच्या विद्यालयामध्ये ‘एम.ए. विथ हिन्दुइझम’ हा नवीन अभ्यासक्रम चालू होणार आहे. या अभ्यासक्रमासाठी तुमचे ग्रंथ उपयुक्त आहेत. तुम्ही या. आपण अवश्य बोलूया.’’

४ उ. ‘राजकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि चिकित्सालय’ याच्या प्राचार्या वैद्या नीलम गुप्ता यांनी महाविद्यालयाचे अध्यापक आणि कर्मचारी यांच्यासाठी ‘तणावमुक्तीसाठी साधना’ या विषयावर मार्गदर्शन ठेवण्याची इच्छा व्यक्त करणे : ‘राजकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि चिकित्सालय’ याच्या प्राचार्या वैद्या नीलम गुप्ता या सात्त्विक विचारांच्या आणि सकारात्मक वाटल्या. त्यांनी ‘सनातन संस्थे’ची माहिती मनापासून ऐकून घेतली. त्यांनी स्वतःसाठी ग्रंथ घेतले आणि त्यांच्या ग्रंथालयासाठी ग्रंथांच्या संचाची सूची मागून घेतली. त्यांनी महाविद्यालयाचे अध्यापक आणि कर्मचारी यांच्यासाठी ‘तणावमुक्तीसाठी साधना’ या विषयावर मार्गदर्शन ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.

४ ऊ. वाराणसी, दक्षिण विभागाच्या एका आमदारांना ग्रंथांविषयी माहिती सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘मी हे ग्रंथ माझ्या विभागाच्या अंतर्गत अधिकाधिक शाळांमध्ये देण्याचा प्रयत्न करीन.’’

४ ए. भारतीय जनता पक्षाचे सभासद श्री. नरसिंह दासजी यांनी ग्रंथांची माहिती जाणून घेऊन स्वतःसाठी काही ग्रंथ घेणे : भारतीय जनता पक्षाचे सभासद श्री. नरसिंह दासजी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचे जुने वाचक आणि विज्ञापनदाते आहेत. त्यांना सनातन संस्थेविषयी फार आदर आहे. त्यांनी ग्रंथांची माहिती जाणून घेतल्यावर लगेच स्वतःसाठी काही ग्रंथ विकत घेतले.

५. भदोही, उत्तरप्रदेश येथे ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला लाभलेला उस्फूर्त प्रतिसाद !

५ अ. भदोही येथील ‘नॅशनल कॉलेज’ आणि ‘वॉल्थर पब्लिक स्कूल’ या विद्यालयांना संपर्क केला असता त्यांनी विषय ऐकून घेतल्यावर त्वरित शाळेसाठी ग्रंथांची मागणी दिली.

५ आ. एका प्रतिष्ठित आधुनिक वैद्यांनी अतिशय व्यस्त असूनही ‘कुटुंबातील सर्व सदस्यांना साधनेचा विषय सांगा’, असे सांगणे : आधुनिक वैद्य अजित गुप्ता हे रुग्णालयात व्यस्त असतांनाही ‘सनातनचे साधक येणार आहेत’, हे समजताच त्यांनी ‘साधकांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना साधनेचा विषय सांगावा’, अशी इच्छा व्यक्त केली. ‘साधना’ हा विषय ऐकण्यासाठी त्यांच्यासह त्यांची पत्नी, त्यांच्या दोन मुली आणि एक मुलगा, त्यांच्या ‘नर्सिंग’ (परिचारिका) महाविद्यालयाचे प्राचार्य अन् योगशिक्षक, असे सर्व जण जमले होते. आम्ही त्यांना गुरुकृपायोगानुसार साधना, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याविषयीची माहिती सांगितली. त्यांना विषय आवडला. त्यांनी लगेच रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांसाठी ‘तणावमुक्तीसाठी साधना’, हा विषय घेण्यास सांगितला. त्यांनी परिचारिकांच्या महाविद्यालयासाठी ग्रंथही घेतले.

५ इ. भदोही नगरपरिषदेचे अध्यक्ष श्री. अशोककुमार जायस्वाल यांच्या भावाचा ८ दिवसांपूर्वी मृत्यू होऊनही त्यांनी ‘ज्ञानशक्ती अभियान’ हा विषय ऐकून घेऊन सकारात्मक प्रतिसाद देणे : आम्ही भदोही जिल्हा महानगरपालिकेचे अध्यक्ष श्री. अशोक जयस्वाल यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा ‘८ दिवसांपूर्वीच त्यांच्या भावाचे निधन झाले आहे’, असे आमच्या लक्षात आले. तरीही त्यांनी आम्हाला वेळ दिला. त्यांना ग्रंथ अभियानाविषयी सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला.

५ ई. एका प्रतिष्ठित आधुनिक वैद्यांनी रुग्णालयात धर्मशिक्षणाच्या ‘स्लाईड्स’ दाखवण्याची इच्छा दर्शवणे : एक प्रतिष्ठित आधुनिक वैद्य रवींद्र पटेल यांना कोरोना महामारीच्या काळात सनातन संस्थेने केलेले ‘ऑनलाईन’ कार्य सांगितल्यावर त्यांनी त्वरित रुग्णालयामध्ये नामजप लावण्याची आणि धर्मशिक्षणाच्या ‘स्लाईड्स’ दाखवण्याची इच्छा दर्शवली. त्यांनी रुग्णालयासाठी ग्रंथ घेतले. ते रुग्णालयातील कर्मचार्‍यांसाठी ‘तणावमुक्तीसाठी साधना’ या विषयावर व्याख्यान घेण्याविषयी सकारात्मक प्रतिसाद दिला.’

– सौ. प्राची जुवेकर, वाराणसी, उत्तरप्रदेश (१९.२.२०२२)