देशी आणि विदेशी गांडूळ यांमधील भेद

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

‘केवळ भारतीय देशी गांडूळच शेतकर्‍याचा खरा मित्र आहे. सेंद्रिय शेतीमध्ये वापरले जाणारे गांडूळ खत (Vermicompost) बनवण्यासाठी विदेशी गांडूळ भारतात आणले गेले. हे विदेशी गांडूळ १६ अंश सेल्सिअसपेक्षा अल्प आणि २८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानांत जिवंत राहू शकत नाहीत. भारतीय गांडूळे मात्र हिमाच्छादित टेकड्यांपासून वाळवंटांपर्यंत एकसारखेच काम करतात. आता संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, विदेशी गांडुळांच्या विष्ठेत ‘आर्सेनिक’, पारा, शिसे यांसारख्या विषारी धातूंचे अंश असतात आणि शेतात ‘व्हर्मीकंपोस्ट’ (विदेशी गांडुळांची विष्ठा असलेले खत) वापरल्याने ते विषारी अंश वनस्पतींतून मानवी शरिरात जाऊ शकतात. त्यामुळे सेंद्रिय शेतीद्वारे ‘व्हर्मीकंपोस्ट’ घालून पिकवलेले धान्य ‘विषमुक्त’ असू शकत नाही.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२१.८.२०२२)