झारखंडमध्ये मुसलमान तरुणीवर तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या पुरुषाशी विवाह करण्यासाठी बळजोरी : उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप

(प्रतिकात्मक चित्र)

रांची – झारखंड उच्च न्यायालयाने एका २६ वर्षांच्या मुसलमान तरुणीला तिच्या दुप्पट वयाच्या पुरुषाशी विवाह करण्यासाठी बळजोरी करणार्‍या कुटुंबियांपासून वाचवण्याचा आदेश दिला. या तरुणीचे अन्य धर्मीय पुरुषासमवेत प्रेमप्रकरण चालू आहे. न्यायमूर्ती एस्.के. द्विवेदी यांनी रांचीच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना या प्रकरणात हस्तक्षेप करून मुसलमान तरुणीवर विवाहासाठी कोणत्याही प्रकारे बळजोरी केली जाणार नाही, याची निश्चिती करण्याचा आदेश दिला आहे.

यासंदर्भात मुसलमान तरुणीने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिने सांगितले की, ती तिच्या विवाहित बहिणीकडे गोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहाते. तिचे कुटुंबीय तिला वेगळ्या धर्माच्या व्यक्तीसमवेत विवाह करण्यास विरोध करत आहेत. तसेच तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या मुसलमान व्यक्तीसमवेत विवाह करून देण्यात येत आहे.

यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, विवाहाचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि तो व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा अविभाज्य भाग आहे.

संपादकीय भूमिका

अशा वेळी स्त्री-मुक्ती संघटना, धर्मनिरपेक्षतावाले काहीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !