बांगलादेशात हिंदु क्रिकेटपटू लिटन दास यांना धर्मांतरासाठी धमक्या !

नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्याने धर्मांधांना पोटशूळ

नवी देहली – बांगलादेश क्रिकेट संघातील हिंदु क्रिकेटपटू लिटन दास यांनी नवरात्रोत्सवानिमित्त फेसबुकद्वारे शुभेच्छा दिल्या; मात्र धर्मांधांना याचा पोटशूळ उठला असून त्यांच्याकडून दास यांना धर्मांतर करण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत.

यापूर्वीही लिटन दास यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हाही त्यांना धर्मांधांनी धमक्या दिल्या होत्या, तसेच शिवीगाळ केली होती. त्या वेळी एका लहान मुलाचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्यामध्ये त्या मुलाला त्याच्या आवडत्या खेळाडूविषयी विचारण्यात आले आणि त्याने म्हटले होते की, सौम्य सरकार आवडत नाही; कारण तो हिंदु क्रिकेटपटू आहे. (मुसलमान मुलांवर लहानपणापासूनच हिंदुद्वेषाचे संस्कार केले जातात, हेच यातून दिसून येते ! – संपादक)

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या वारंवार येत असतात. कधी त्यांची घरे जाळली जातात, कधी मंदिरांची तोडफोड केली जाते, तर कधी हिंदु खेळाडूंशी चुकीचे वर्तन केले जाते.

संपादकीय भूमिका

ही आहे इस्लामी देशांतील हिंदूंची स्थिती ! भारतातील अल्पसंख्य धोक्यात असल्याची आवई उठवणार्‍या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना आता गप्प का ?  भारत सरकारना अशा संघटनांना आणि बांगलादेश सरकारला जाब विचारला पाहिजे !