हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे हिंदु व्यक्तीचे बलपूर्वक धर्मांतर

  • सुंता करून गोमांस खायला लावले !

  • धर्मांतरितावर न्यूनतम ३ हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी दबाव !

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – येथे श्रीधर गंगाधर या दलित हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले. या प्रकरणात १२ जणांविरुद्ध तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे; मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

गंगाधर यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंंड्या जिल्ह्यातील अत्तावर रहमान नावाच्या माणसाच्या संपर्कात तो आला होता. रहमान त्याला बेंगळुरू येथील बनाशंकरी मशिदीत घेऊन गेला. तेथे अजीज नावाचा एक माणूस त्याला इस्लामची आयते (वाक्ये) शिकवू लागला. त्यानंतर त्याला तेथील अनेक मशिदींमध्ये नेण्यात आले. त्यानंतर त्याची सुंता करण्यात आली, तसेच त्याला बलपूर्वक गोमांस खाऊ घालण्यात आले. जेव्हा त्याने गोमांस खाण्यासाठी नकार दिला, तेव्हा त्यास मारहाणही करण्यात आली. याखेरीज न्यूनतम ३ हिंदूंना मुसलमान धर्मात आणण्यासाठी त्याच्यावर दबाव आणण्यात आला. एके दिवशी त्याच्या हातात पिस्तुल देऊन त्याचे छायाचित्रही काढण्यात आले.

संपादकीय भूमिका

  • बहुसंख्य हिंदूंच्या देशात अल्पसंख्यांकांकडून अशा घटना घडणे हिंदूंना लज्जास्पद !
  • कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे असे करण्याचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !