हिंदूंनो, हलाल प्रमाणपत्राद्वारे राष्ट्राची अर्थव्यवस्था हस्तगत करण्याचे षड्यंत्र हाणून पाडा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

मेळाव्याला उपस्थित धर्मप्रेमी

अमरावती, २५ सप्टेंबर (वार्ता.) – भारत धर्मनिरपेक्ष देश असतांना देशात हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून धर्माच्या नावावर समांतर अशी इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था आणि देशाची सुरक्षा यांना धोका निर्माण झाला आहे. हिंदूंनी जागृत होऊन हे षड्यंत्र हाणून पाडायला हवे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. समितीच्या वतीने २४ सप्टेंबरला येथे झालेल्या समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’च्या अंतर्गत आयोजित हिंदूसंघटन मेळाव्यात उपस्थित हिंदु धर्मप्रेमींना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रामाणिकपणे कार्य करणारी हिंदु जनजागृती समिती ही एकमेव संघटना आहे. मी समितीसमवेत नेहमीच कार्य करीन. हिंदु युवकांनी हिंदूसंघटनासाठी एकत्र यावे’, असे उद्गार भारतीय सिंधू सभेचे पश्चिम विदर्भ युवा संघटक श्री. प्रकाश सिरवानी यांनी काढले.

मेळाव्यात समितीचे व्यापक कार्य आणि मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम यांविषयीची चित्रफीत दाखवण्यात आली. समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या रणरागिणींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके दाखवली. धर्मप्रेमींनी राष्ट्र आणि धर्म कार्य करतांना आलेले अनुभव सांगितले. शेवटी हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन संघटितपणे धर्मकार्य करण्याचा निर्धार उपस्थित धर्मप्रेमींनी केला.

उपस्थित मान्यवर : भाजपचे जिल्हाध्यक्ष किरण पातुरकर, विश्व हिंदु परिषद महानगरचे अध्यक्ष दिनेश सिंह, अधिवक्ता राजेंद्र पांडे, जयंत कद्रे, ‘जाधव ग्रुप’च्या मार्गदर्शक श्रीमती सुधाताई जाधव, डॉ. अविनाश चौधरी

क्षणचित्रे

१. मेळाव्यानंतरच्या बैठकीत धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

२. धर्मप्रेमी सर्वश्री अमित पाटील आणि मनोज बागल यांनी समितीसमवेत कार्य करतांना आलेले चांगले अनुभव सांगितले.

३. श्री. सुनील घनवट आणि श्री. प्रकाश सिरवानी यांच्या हस्ते समिती प्रकाशित ‘हलाल जिहाद’ या ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले.