आतंकवादी याकूब मेमनचे थडगे खोदून मृतदेह समुद्रात फेकून द्या ! – नितीन शिंदे

सांगली, १० सप्टेंबर (वार्ता.) – मुंबईत बाँबस्फोट घडवून शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी घेणार्‍या आणि न्यायालयाने फाशी दिलेल्या क्रूर आतंकवादी याकूब मेमनच्या थडग्यावर संगमरवरी फरशांचा कट्टा बांधून, विशेष दिवे लावून, फुले वाहून उदात्तीकरण करणे, हे धक्कादायक आहे. अशा आतंकवादी याकूब मेमनचे थडगे खोदून मृतदेह समुद्रात फेकून द्या, तसेच थडग्याचे उदात्तीकरण करणार्‍यांवर राष्ट्रद्रोहाचा खटला नोंद करावा, अशी मागणी ‘शिवप्रताप मुक्ती आंदोलना’चे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली. याकूब मेमनच्या थडग्याच्या उदात्तीकरणाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रभक्तांनी शिवतीर्थ येथे निदर्शने केली. त्या प्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी सर्वश्री अविनाश मोहिते, रवि सावंत, भूषण गुरव, मोहन जामदार, संजय जाधव, प्रकाश चव्हाण, प्रदीप निकम, प्रसाद रिसवडे, प्रकाश निकम, बाळासाहेब मोहिते-पाटील, युवराज जाधव, संतोष शिंदे, अजय काकडे, यांसह भाजप, शिवसेना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान, हिंदु एकता आंदोलन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.