पुणे येथील गणेशोत्सव मंडळात क्रांतीकारकांचे ‘फ्लेक्स प्रदर्शन’ तसेच शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन

फ्लेक्स प्रदर्शनाची माहिती सांगतांना समितीचे कार्यकर्ते
व्याख्यानाच्या वेळी उपस्थित युवक, युवती आणि जिज्ञासू
स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर करताना समितीचे कार्यकर्ते

पुणे – बावधन, कोथरूड येथे ‘बावधान गणेशोत्सव मंडळा’त १ सप्टेंबर या दिवशी क्रांतीकारकांचे ‘फ्लेक्स प्रदर्शन’ लावण्यात आले होते, तसेच ‘काळानुसार स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता आणि साधनेचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान झाले. समाजातील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या माध्यमातून या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी युवक, युवती आणि जिज्ञासू उपस्थित होते. व्याख्यानानंतर स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. शेवटी हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घेण्यात आली.