पाकिस्तानमध्ये ८ वर्षांच्या हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करून डोळे फोडले

प्रतीकात्मक छायाचित्र

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील उमरकोट शहरात एका ८ वर्षांच्या हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिचे डोळे फोडण्यात आल्याची घटना घडली आहे. या मुलीवर पाकच्या हैदराबाद येथील सरकारी रुग्णालयात उपचार चालू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. एका हिंदु मानवाधिकार कार्यकर्त्याने या मुलीचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे. यात या मुलीला स्ट्रेचर वरून रुग्णालयात नेतांना दिसत आहे. ही मुलगी भील समाजातील आहे. पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही.

संपादकीय भूमिका

  • पाकमधीलच नव्हे, तर इस्लामी देशांतील अल्पसंख्य हिंदूंचा कुणीही वाली नाही ! आंतरराष्ट्रीय स्तरावरील कथित मानवाधिकार संघटनाही अशा वेळी गायब असतात, हे लक्षात घ्या !
  • भारतात एखाद्या मुसलमान मुलीच्या संदर्भात अन्य धर्मियांकडून अशी घटना घडली असती, तर इस्लामी जगतातून भारताला जाब विचारण्यात आला असता; मात्र भारत सरकार अशा घटनांत मात्र मौन बाळगतो !