( गंगा-जमुनी तहजीब म्हणजे गंगा आणि यमुना या नद्यांच्या तिरांवर वास्तव्य करणार्या हिंदू अन् मुसलमान यांच्यातील कथित ऐक्य दर्शवणारी संस्कृती !)
नवी देहली – संगीत क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा जगविख्यात ‘ग्रॅमी पुरस्कारा’चे दोन वेळा मानकरी ठरलेले संगीतकार आणि पर्यावरणवादी रिकी केज यांनी नुकतीच अयोध्येतील रामजन्मभूमीला भेट दिली. त्यांनी ट्विटरवर व्हिडिओ प्रसारित करून या भव्य मंदिराच्या चालू असलेल्या बांधकामाविषयी माहिती दिली. ट्वीटमध्ये ते म्हणाले, ‘मी रामजन्मभूमीला भेट दिली. येथील बांधकाम पाहून मी भारावून गेलो. श्रीराममंदिर उभे राहिल्यावर ते १ सहस्र वर्षे टिकेल.’ केज पुढे म्हणाले की, राममंदिराला भेट देण्याची मला संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. येथे चहूबाजूला बांधकाम चालू आहे. जगभरातील लोकांनी या मंदिराला भेट देऊन श्रीरामाचे आशीर्वाद घ्यावेत.
Visited the Ram Temple site in Ayodhya. Absolutely amazed 🙂 A monument that will last over a 1000 years! We are the generation that saw it built 🙂 @narendramodi @ShriRamTeerth pic.twitter.com/E7BUZLq8P8
— Ricky Kej (@rickykej) August 26, 2022
केज यांच्या या ट्वीटवर धर्मांध मुसलमानांनी विरोध दर्शवत केज यांचा निषेध केला आहे. खान नावाच्या एका व्यक्तीने म्हटले, ‘मंदिराला भूमी (मुसलमानांकडून) दान स्वरूपात मिळाली आहे. बाबरी मशिदीच्या संदर्भात झालेल्या अन्यायाचा इतिहास आम्ही विसरणार नाही !’ (‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आक्षेप घेणार्यांनी या देशातून चालते व्हावे’, असे कुणी म्हटल्यास त्यात चूक ते काय ? – संपादक)
साम्यवाद्यांनाही केज यांच्या व्हिडिओवरून पोटशूळ उठला आहे. सुचित्रा कार्तिकेयन् या ‘द हिंदू’ नियतकालिकाच्या महिला पत्रकाराने म्हटले, ‘काहीही बरळू नका ! ग्रॅमी पुरस्कार एकाहून अधिक वेळ जिंकणारा एकमेव भारतीय अचानक ‘भक्त’ कसा झाला ?’ (हिंदुद्वेष्ट्यांकडून रा.स्व.संघ आणि हिंदुत्व यांचे समर्थक असणार्या हिंदूंना ‘भक्त’ या शब्दाद्वारे उपरोधिक टीका केली जाते.)
संपादकीय भूमिका
|