‘पृथ्वीवर देव आहे’, हे सत्य असल्याचे दर्शवणारे अनुभव

१. काश्मीरमधील ‘अमरनाथ’ मंदिरामध्ये बर्फाचे ‘शिवलिंग’ आपोआप बनते.
२. हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील माता ज्वालादेवी मंदिरातील ज्योत विनाइंधन अखंड जळते.
३. मध्यप्रदेशमधील जबलपूर जिल्ह्यातील ‘मैहरमाता मंदिरा’मध्ये भक्त आल्हा हा १२ व्या शतकापासून आजपर्यंत अजूनही रात्री दर्शनास येतो.
४. जैसलमेर (राजस्थान) सीमेवर असलेल्या ‘तनोटमाता मंदिरा’च्या येथे शत्रूने फेकलेल्या ३ सहस्र बाँबपैकी एकाही बाँबचा स्फोट झाला नाही.
५. जलप्रलयाच्या मोठ्या आपत्तीतही ‘केदारनाथ मंदिरा’ला अजिबात धक्का लागला नाही.
६. आजही केवळ ‘रामसेतू’चेच दगड पाण्यावर तरंगतात.
७. ‘रामेश्वरम् धाम’मध्ये (तमिळनाडू) समुद्रात कधीच वादळ येत नाही.
८. पुरी (ओडिशा) येथील श्री जगन्नाथाच्या मंदिरावरून कोणताही पक्षी किंवा विमान जात नाही.
९. पुरी येथे जगन्नाथ मंदिरावरील ध्वज नेहमी वार्‍याच्या विरुद्ध दिशेने फडकतो.
१०. उज्जैनमध्ये (मध्यप्रदेश) भैरवनाथबाबा यांच्या मूर्तीने मदिरा पिणे.
११. माता गंगा आणि नर्मदा या नद्यांचे पाणी कधीही खराब होत नाही.
१२. चित्तोडगड येथील ‘बाण माताजी’च्या मंदिरात आरतीच्या वेळी ‘त्रिशूळ’ आपोआप हलते.

(साभार : सामाजिक माध्यम)