बिहारमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांच्या घरांवर सीबीआयच्या धाडी

पाटलीपुत्र (बिहार) – राष्टीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात झालेल्या नोकरी घोटाळ्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) या पक्षाच्या नेत्यांच्या घरांवर धाडी घातल्या. अशफाक करीम आणि सुनील सिंह यांच्या घरांसह अनेक ठिकाणी या धाडी घालण्यात आल्या. बिहारमध्ये नवीन सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. त्याआधी या धाडी घातल्याने यामागे राजकीय उद्देश असल्याची टीका होत आहे.

१. सुनील सिंग यांनी म्हटले की, जाणीवपूर्वक ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईला काही अर्थ नाही. आम्हाला घाबरवले, तर आमदार त्यांच्या बाजूने मतदान करतील, असे त्यांना वाटत आहे.

२. खासदार मनोज झा यांनी सांगितले, ‘अंमलबजावणी संचालनालय, आयकर विभाग किंवा सीबीआयने नाही, तर भाजपने ही धाड टाकली आहे. या यंत्रणा भाजपच्या अंतर्गत काम करतात. भाजपच्या संहितेवरच या कार्यालयांचे कामकाज चालू आहे. बहुमत चाचणी आहे आणि आता काय चालू आहे ? आता याचा पूर्ण अंदाज आला आहे.’