चिनी आस्थापन ‘विवो इंडिया’ची २ सहस्र २१७ कोटी रुपयांची करचुकवेगिरी उघड

नवी देहली – महसूल गुप्तचर संचालनालयाने (‘डी.आर्.आय.’ने) ‘विवो मोबाईल इंडिया प्रा.लि.’ या भ्रमणभाष निर्मिती करणार्‍या आस्थापनाने केलेली २ सहस्र २१७ कोटी रुपयांची करचुकवेगिरी पकडली आहे. ‘डी.आर्.आय.’च्या अधिकार्‍यांनी विवो इंडियाच्या कारखाना परिसरात छापा टाकला होता. त्यात भ्रमणभाष संचांच्या निर्मितीसाठी आयात केलेल्या काही वस्तूंच्या तपशिलाच्या संदर्भात जाणूनबुजून चुकीचे स्पष्टीकरण दिल्याच्या दिशेने संकेत करणारे पुरावे मिळाले होते.

डी.आर्.आय.ने विवो इंडियाला कारणे दाखवा नोटीस जारी करून सीमाशुल्क कायदा, १९६२ च्या अंतर्गत २ सहस्र २१७ कोटी रुपयांच्या सीमा शुल्काची मागणी केली आहे. विवो इंडियाने स्वेच्छेने ६० कोटी रुपये जमा केले आहेत.

संपादकीय भूमिका

  • अशा चिनी आस्थापनांवर भारतात बंदी घाला !
  • या आस्थापनांनी बुडवलेला कर त्यांच्याकडून चक्रवाढ व्याजाने वसूल करा !