जिहाद्यांपासून स्वत:सह कुटुंबियांना वाचवायचे असेल, तर हिंदूंना आत्मरक्षणासाठी सज्ज व्हावे लागेल ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगाणा

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हिंदू आपल्याच देशात असुरक्षित ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

मुंबई – नूपुर शर्माचे समर्थन केले; म्हणून राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये हिंदुविरोधी शक्तींकडून हिंदूंची गळे कापून हत्या केली जात आहे. हिंदू आणि देशविरोधी जिहादी शक्ती यांच्यात युद्धाला आरंभ म्हणजेच युद्धाचा बिगुल वाजलेला आहे. हिंदूंनी ‘सरकार आणि पोलीस आपल्याला वाचवतील’, या भरवशावर राहू नये. हिंदूंनी आत्मरक्षणासाठी प्रशिक्षण घेतले, तरच ते वाचतील. हिंदूंना स्वत:ला आणि स्वत:च्या कुटुंबाला वाचवायचे असेल, तर प्रत्येक हिंदूला आत्मरक्षणासाठी सज्ज व्हावे लागेल, असे आवाहन प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि तेलंगाणा येथील भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले आहे.

श्री. टी. राजासिंह

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘हिंदू आपल्याच देशात असुरक्षित ?’, या ऑनलाईन विशेष संवादात ते बोलत होते.

श्री. गंगाधर कुलकर्णी, कार्याध्यक्ष, श्रीराम सेना

सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्र न आल्यास कर्नाटकात हिंदूंना बाहेर फिरणे कठीण होईल ! – गंगाधर कुलकर्णी, कार्याध्यक्ष, श्रीराम सेना, कर्नाटक

कर्नाटक राज्यामध्ये प्रवीण नेट्टारू यांच्या आधी फेब्रुवारी मासात हर्ष याची हत्या करण्यात आली होती. याचा मूळ प्रारंभ भटकळ (कर्नाटक) येथून वर्ष १९९३ ला झाला. त्या वेळी तत्कालीन भाजप आमदार चित्तरंजन यांची हत्या झाल्यावर दंगल झाली आणि ९ मास संचारबंदी लागली होती. तेव्हापासून कर्नाटकात सातत्याने हिंदूंच्या हत्या होत आहेत. कर्नाटकात गेल्या ५-६ वर्षांत ३६ हून अधिक हिंदूंच्या हत्या झालेल्या आहेत. या विरोधात सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्र आल्या नाहीत, तर कर्नाटकात हिंदूंना बाहेर फिरणेही कठीण होईल.

श्री. प्रशांत संबरगी

पी.एफ्.आय.वर तात्काळ कारवाई न केल्यास आणखी भयावह परिणामांना सामोरे जावे लागेल ! – प्रशांत संबरगी, चित्रपट वितरक आणि उद्योगपती, कर्नाटक

प्रवीण नेट्टारू याने त्याच्या मांसाच्या दुकानात काम करणार्‍या एका मुसलमानाला ३ मासांपूर्वी काढले होते. ‘हलाल मांस’ बंद करून हिंदू पद्धतीचे ‘झटका मांस’ विकणे चालू केले. त्यामुळे त्यांची हत्या झालेली आहे. हिंदूंच्या हत्या करून आम्ही किती शक्तीशाली आहोत, हे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा (‘पी.एफ्.आय.’चा) दाखवण्याचा प्रयत्न आहे. पी.एफ्.आय. ही भारतातील ‘अल् कायदा’ (एक कट्टर जिहादी आतंकवादी संघटना) आहे. जर तिच्यावर तात्काळ कारवाई केली नाही, तर पुढे जाऊन आणखी भयावह परिणामांना सामोरे जावे लागू शकते.


हे पहा –

हिन्दू जनजागृति समिति आयोजित 🔊 विशेष संवाद
🚩 चर्चा हिन्दू राष्ट्र की…

🟢 हिन्दू अपने ही देश में असुरक्षित ?

___________________________________ 

श्री. मोहन गौडा

कर्नाटक सरकारने केंद्र सरकारकडे पी.एफ्.आय.वर कारवाईची शिफारस करावी ! –  मोहन गौडा, कर्नाटक राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

कर्नाटकात मागे झालेल्या २३ हिंदूंच्या हत्यांपैकी १० हत्यांमध्ये पी.एफ्.आय. आणि ‘सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’ (एस्.डी.पी.आय.) यांचा सहभाग असल्याचे आरोपपत्र न्यायालयात प्रविष्ट झाले होते. काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनीही या संघटनांवर बंदीची मागणी केली होती. भाजपने वर्ष २०१८ च्या निवडणूक घोषणापत्रामध्ये ‘सरकार आल्यास पी.एफ्.आय. आणि ‘कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी’ (के.एफ्.डी.) या संघटनांवर बंदी आणू’, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार कर्नाटक सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करून या धर्मांध संघटनांवर कारवाई केली पाहिजे.