जबलपूर (मध्यप्रदेश) येथील रुग्णालयाला लागेल्या भीषण आगीत ८ जण मृत्यूमुखी

जबलपूर (मध्यप्रदेश) – येथील एका खासगी रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील दामोह नाक्याजवळ असलेल्या ‘न्यू लाईफ मल्टी-स्पेशॅलिटी हॉस्पिटल’मध्ये १ ऑगस्ट या दिवशी ही घटना घडली. मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी ५ रुग्ण आणि रुग्णालयाचे ३ कर्मचारी यांचा समावेश आहे, तर १२ हून अधिक जण यामध्ये घायाळ झाले आहेत.

ही आग ‘शॉर्ट सर्किट’मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये साहाय्य करण्याचे घोषित केले आहे.