अमेरिकेतील ‘बंदूक संस्कृती’च्या विरोधात खालच्या सदनात विधेयक संमत !

अमेरिकेच्या ‘सीनेट’मध्ये विधेयक संमत होणे कठीण !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील बंदूक संस्कृती आणि तिचे दुष्परिणाम पहाता अमेरिकेतील प्रतिनिधी सभेने, म्हणजेच खालच्या सदनाने यासंबंधीचे विधेयक संमत केले. येथे २१७ विरुद्ध २१३ मते पडल्याने विधेयकास स्वीकृती मिळाली. या विधेयकास सत्ताधारी ‘डेमोक्रॅट्स’ पक्षाचा पाठिंबा असून ‘रिपब्लिकन्स’ पक्ष यास विरोध करत आहे. त्यामुळे आता ‘सीनेट’मध्ये, म्हणजे वरच्या सदनामध्ये विधेयक संमत होऊन त्यास कायद्याचे स्वरूप मिळणे कठीण मानले जात आहे.

सीनेटमध्ये डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन्स यांचे ५०-५० खासदार असून विधेयक संमत होण्यासाठी किमान ६० खासदार त्यास अनुकूल असणे आवश्यक असते.

अमेरिके अनेक सार्वजनिक ठिकाणी बंदुकीद्वारे अंधादुंध गोळीबार करून अनेक जण मरण पावल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर हे विधेयक मांडण्यात आले होते.