देवगड – देवगड पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील कोट्यवधी रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणी ३ संशयित आरोपींना देवगड येथील प्रथमवर्ग न्यायालयाने ३० जुलै या दिवशी १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी बजावली.
या प्रकरणामध्ये ५ आरोपी असून त्यांनी १० एप्रिल २००८ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत देवगड पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत असतांना खोटे कागदपत्र बनवून स्वतःच्या लाभासाठी १ कोटी ८८ लाख ४७ सहस्र रुपयांचा अपहार केला. ही रक्कम आणि त्याचे व्याज मिळून एकूण ३ कोटी २९ लाख ७८ सहस्र ५७१ रुपयांचा अपहार केल्याची तक्रार देवगडचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रजापती शामराव थोरात यांनी दिली होती.
या प्रकरणातील गंगाधर बापत्रा अल्लमवार, हा या विभागात ‘क्लार्क’ म्हणून काम करत होता. विष्णु सर्जेराव पाळवदे हे शिक्षक होते, तर मधुकर दाजी राजम हे शिपाई म्हणून काम करत होते. या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. यातील एक संशयित आरोपी महेंद्र एकनाथ वाडेकर यांचा मृत्यू झाला आहे.
संपादकीय भूमिका
|