संभाजीनगर – येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचे मालेगाव येथील एकाशी विवाह लावणार्या आरोपींपैकी एका महिलेला जवाहरनगर पोलिसांनी १३ जुलै या दिवशी अटक केली. शहेनाज उपाख्य सोनु अय्याज कुरेशी (वय २२ वर्षे) असे आरोपी महिलेचे नाव आहे. (धर्मांध महिलाही गुन्हेगारीत पुढे ! – संपादक) तिला १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.