हिंदूंच्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर पनवेल आणि खालापूर येथे प्रशासनाला निवेदने !

पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

पनवेल – राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैयालाल आणि महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे यांची काही कट्टरतावादी जिहाद्यांनी हत्या केली. हिंदूंच्या नृशंस हत्या करणार्‍यांना फाशी, तसेच त्यांना साहाय्य करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर आणि खालापूरच्या नायब तहसीलदार कल्याणी कदम यांच्या माध्यमातून भारत सरकारला निवेदन दिले.

खालापूरच्या नायब तहसीलदार कल्याणी कदम यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

हिंदूंच्या हत्यांमागील षड्यंत्राचा छडा लावावा. हत्या करणार्‍यांना पैसा पुरवणारे, त्यांना आश्रय आणि प्रशिक्षण देणारे या सर्वांची चौकशी करून त्यांची पाळेमुळे खणून काढावीत, तसेच दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. यांसह ‘सरकारने मदरशांना निधी देणे बंद करावे, आतंकवादाचे प्रशिक्षण देणारे मदरसे त्वरित बंद करावेत’, या मागण्या निवेदनात केल्या आहेत.