आणीबाणी म्हणजे लोकशाहीची हत्या !- दीपक शिंदे, भाजप

आणीबाणी निषेधदिन’प्रसंगी उपस्थित भाजप आमदार सुधीर गाडगीळ आणि अन्य

सांगली, २८ जून (वार्ता.) – प्रत्येक वर्षी भाजपच्या वतीने २५ जून हा दिवस ‘आणीबाणी निषेधदिन’ म्हणून पाळला जातो. या निषेधदिनात आणीबाणीत कारागृहवास पत्करलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी भाजप शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हणाले, ‘‘त्या काळी देशावर आणीबाणी लादून देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना अवैधरितीने कारागृहात डांबले गेले. इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेली आणीबाणी म्हणजे लोकशाहीची हत्याच होय.’’

या प्रसंगी ‘लोकतंत्र सेनानी’ चे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, प्रकाश बिरजे, डॉ. सुभाषचंद्र मालाणी, अवधूत ठोसर, विनायक नवरे यांनी आणीबाणीच्या काळातील अनुभव सांगितले. स्वागत आणि प्रस्तावना सरचिटणीस अविनाश मोहिते यांनी केली. नगरसेवक लक्ष्मण नवलाई यांनी आभार मानले. या प्रसंगी सौ. नीता केळकर, सौ. संगीता खोत, सौ. वैशाली पाटील यांसह अन्य भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.