हिंदु असल्याचे सांगून हिंदु तरुणीची फसवणूक करून तिच्याशी विवाह करणार्‍या जुबेर याला अटक

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील महंमद शमी उपाख्य जुबेर याने स्वतःचे सुरेश असे नाव सांगून एका हिंदु तरुणीशी विवाह केल्याच्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. तरुणीची फसवणूक करणे, तिच्यावर लैंगिक अत्याचार करणे आणि नंतर तिला गर्भपात करायला लावणे, यांविषयीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जुबेर याने या तरुणीशी विवाह केल्यानंतर दुसरा विवाहही केला होता. जुबेर याची पीडित तरुणीशी फेसबूकवरून ओळख झाली होती. त्याने फेसबूकवर त्याचे नाव सुरेश पाल असे ठेवले होते. वर्ष २०१८ मध्ये त्याने या तरुणीशी येथील मनकामेश्‍वर मंदिरात जाऊन विवाह केला होता. नंतर तिचा छळ करून दोन वेळ गर्भपात करण्यास भाग पाडले. तिच्यावर तो धर्मांतरासाठीही दबाव आणत होता.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधात कायदा असूनही अशा घटना थांबलेल्या नाहीत. यावरून ‘केवळ कायदे करून गुन्हे थांबत नाही’, हे स्पष्ट होते. यासाठी आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा झाली, तरच इतर गुन्हेगारांवर पण वचक बसेल !