१२ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना पोलीस उपनिरीक्षकाला अटक !

सोलापूर – रेल्वेस्थानक परिसरात खासगी प्रवासी वाहतूक करतांना एका वाहनावर कारवाई न करण्यासाठी रेल्वेस्थानक पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर यांना १२ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २४ जून या दिवशी रंगेहात पकडले. त्यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वाहनावर कारवाई न करण्यासाठी प्रत्येक मासामध्ये १३ सहस्र रुपयांचा हप्ता देण्याची मागणी क्षीरसागर यांनी तक्रारदाराकडे केली होती. तडजोडीने १२ सहस्र रुपये देण्याचे निश्चित झाले होते.

संपादकीय भूमिका 

भ्रष्टाचाराने पोखरलेले पोलीस प्रशासन !