१. रज-तमाचा संपर्क असलेल्या माणसावर कुठेतरी सूक्ष्म आणि चांगला पालट झाल्याचे जाणवणे
‘मला सुंदर आणि सात्त्विक मंडळींचा सहवास मिळणे, हा माझ्या लक्षात रहाण्यासारखा अनुभव आहे. विशेषतः माझ्यासारख्या स्थूल जगात वावरणाऱ्या आणि रज-तमाचा संपर्क असलेल्या माणसावर दैवी बालिकांच्या सत्संगाचा कुठेतरी सूक्ष्म आणि चांगला पालट झाल्याचे जाणवले.’
– अधिवक्ता मकरंद आडकर, सर्वाेच्च न्यायालय, देहली. (अध्यक्ष, महाराष्ट्र शैक्षणिक तथा सांस्कृतिक संस्था, नवी देहली) (१३.६.२०२२)
२. ‘मी या पूर्वी अशा प्रकारचे (रामनाथी आश्रमासारखे) भावपूर्ण स्थळ कुठेही पाहिले नाही.’
– श्री. प्रशांत विलासराव कदम सोंजी, अध्यक्ष, श्री तुळजाभवानी चरण तीर्थ सेवाभावी मंडळ, तुळजापूर.
३. ‘पृथ्वीवर असलेला स्वर्ग आणि दैवी राज्य पाहिले अन् मन तृप्त झाले.’
– श्री. अजय (भैय्या) ज्ञानेश्वर साळुंके, अध्यक्ष, जनहित संघटना महाराष्ट्र राज्य, श्रीक्षेत्र तुळजापूर, जिल्हा धाराशिव. (१३.६.२०२२)
४. ‘आश्रमातील सर्व साधकांचे वागणे आणि हसतमुख तोंडवळे पाहून ‘आपणही असेच असले पाहिजे’, असे मला वाटले. ‘आश्रमाला पुनःपुन्हा भेट दिली पाहिजे’, असे मला वाटते.’
– श्री. ऋषिकेश राव, युवा गर्जन सेना, राममूर्तीनगर, बेंगळुरू.
५. ‘आश्रम पाहिल्यावर मला ‘आश्रम हा स्वर्ग आहे’, असा अनुभव आला.’
– श्री. दिनेश कुमार जैन, पुत्तुरू, कर्नाटक.
६. ‘आश्रम शुद्ध आणि अद्भुत असून भक्तीभावाने भरलेला आहे’, असे मला वाटले.’
– श्री. दिनेशराव चव्हाण, शिवमोग्गा, कर्नाटक. (१२.६.२०२२)
|