६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. संजय मराठे यांनी गायलेल्या रागांचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

१. राग – सामंत सारंग

श्री. संजय मराठे

 

अ. ‘श्री. संजय मराठे ‘सामंत सारंग’ राग गाऊ लागल्यावर माझ्या अनाहतचक्रावर थंडावा जाणवू लागला आणि माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली. गायनाला आरंभ झाल्यावर सुषुम्ना नाडी लगेच कार्यरत झाल्यामुळे ‘श्री. संजय मराठे यांच्या गायनातून उच्च स्तराची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत’, हे लक्षात आले.

आ. श्री. मराठे गात असतांना ‘आपण चैतन्याच्या सागरातच आहोत’, असे मला जाणवू लागले. त्यामुळे मी ‘सामंत सारंग रागामुळे वातावरणात कोणती स्पंदने किती टक्के प्रक्षेपित होत आहेत ?’, हे शोधून काढले.

या सारणीवरून सामंत सारंग रागातून चैतन्याची स्पंदने सर्वाधिक प्रमाणात प्रक्षेपित होत असल्याचे लक्षात आले.

इ. सामंत सारंग रागाचा परिणाम अंतिमतः विशुद्धचक्रावर होत असल्याचे लक्षात आले.

ई. सामंत सारंग राग ऐकत असतांना अचानक माझा श्रीरामाचा नामजप चालू झाला. त्यामुळे मी ‘या रागातून कोणत्या देवतांची तत्त्वे प्रक्षेपित होत आहेत ?’, हे शोधून काढले.

यावरून ‘सामंत सारंग रागातून श्रीरामाचे तत्त्व सर्वाधिक प्रमाणात प्रक्षेपित होत असल्याने तो राग ऐकत असतांना माझा श्रीरामाचा नामजप चालू झाला’, हे लक्षात आले.

उ. सामंत सारंग रागातून तारक स्पंदने ७० टक्के आणि मारक स्पंदने ३० टक्के प्रक्षेपित होत असल्याचे मला जाणवले.

ऊ. गायनाच्या शेवटी सामंत सारंग रागातून पुढीलप्रमाणे स्पंदने प्रक्षेपित झाली.

शेवटी सामंत सारंग रागामुळे वातावरणात आनंदाच्या स्पंदनांमध्ये ५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे लक्षात आले.

ए. श्री. संजय मराठे यांच्या गायनातून चैतन्य पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित होत असल्याने गायनाला आरंभ झाल्यापासूनच एका साधिकेला त्रास देणारी वाईट शक्ती श्री. मराठे यांच्या भोवती फिरून त्रासदायक शक्ती प्रक्षेपित करत होती. तरीही त्या त्रासदायक शक्तीचा श्री. मराठे यांच्यावर कोणताही परिणाम होत नव्हता; कारण मला त्यांच्या गायनातून चांगली स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे जाणवत होते. त्यामुळेच मला वरील अनुभूती आल्या.

२. राग – चंद्रकंस

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

अ. श्री. संजय मराठे यांनी चंद्रकंस रागाच्या गायनाला आरंभ केल्यावर मला माझ्या विशुद्धचक्रावर स्पंदने जाणवू लागली आणि माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

आ. थोड्याच वेळात मला माझ्या सहस्रारावर स्पंदने जाणवू लागली.

इ. चंद्रकंस रागाचे गायन नुकतेच चालू झाले होते. या टप्प्याला रागातून प्रक्षेपित होत असलेली स्पंदने मला पुढीलप्रमाणे जाणवली.

ई. काही वेळाने चंद्रकंस रागाची स्पंदने मला मूलाधारचक्रावर जाणवू लागली.

उ. मला अचानक दत्तगुरूंची आठवण आली; म्हणून मी चंद्रकंस रागामधील देवतातत्त्वे शोधून काढली.

चंद्रकंस रागामध्ये दत्ततत्त्व ७० टक्के असल्याने ‘मला अचानक दत्तगुरूंची आठवण का आली ?’, याचे कोडे उलगडले.

ऊ. नंतर चंद्रकंस रागातून शक्तीची स्पंदने जाणवू लागली. या रागामध्ये मारक तत्त्व ८० टक्के आणि तारक तत्त्व २० टक्के असल्याचेही जाणवले. चंद्रकंस रागामधून मारक तत्त्व प्रक्षेपित होत असल्याने मला शक्तीची स्पंदने जाणवत होती.

ए. शेवटी चंद्रकंस रागाचा परिणाम मणिपूरचक्रावर जाणवू लागला. मणिपुरचक्र हे तेजतत्त्वाशी संबंधित आहे आणि चंद्रकंस रागातूनही शक्तीचीच स्पंदने प्रक्षेपित होत होती. यावरून ‘चंद्रकंस राग हा मारक तत्त्व आणि शक्ती यांच्याशी संबंधित आहे’, हे लक्षात आले.

३. राग – रामकली

अ. श्री. संजय मराठे यांनी गायनाला आरंभ करण्यापूर्वी मला त्या कक्षामध्ये दाब जाणवत होता. तेव्हा तेथील वातावरणात चांगली स्पंदने ४० टक्के आणि त्रासदायक स्पंदने ६० टक्के जाणवत होती.

आ. श्री. संजय मराठे यांनी रामकली रागाच्या गायनाला आरंभ केल्यावर मला त्या रागातून प्रक्षेपित होत असलेली चांगली स्पंदने माझ्या आज्ञाचक्रावर जाणवू लागली.

इ. श्री. मराठे यांच्या चैतन्यमय गायनामुळे वातावरणातील त्रासदायक स्पंदने अल्प होत जाऊन शेवटी पूर्णपणे नाहीशी झाली.

ई. श्री. मराठे खर्जातील स्वर आळवू लागल्यावर मला माझ्या मूलाधारचक्रावर स्पंदने जाणवू लागली आणि माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

उ. मला वातावरणात शिवतत्त्व जाणवू लागले. तेव्हा मी रामकली रागामधील देवतातत्त्वे शोधली.

रामकली हा राग सकाळच्या प्रहरी गायला जातो. सकाळी आपण देवाचे नामस्मरण करतो. ‘या रागातील देवता श्रीराम ही तिची आराध्य देवता ‘शिव’ हिचे नामस्मरण करत असल्याने मला वातावरणात रामतत्त्व न जाणवता शिवतत्त्व जाणवले’, असे लक्षात आले. नंतर कळले, ‘श्री. संजय मराठे हेही शिवभक्त आहेत आणि तेही गातांना शिवाचे स्मरण करत असावेत.’

ऊ. रामकली या रागामध्ये मला तारक तत्त्व २० टक्के आणि मारक तत्त्व ८० टक्के जाणवले. या रागात मारक तत्त्व ८० टक्के असूनही मला शक्ती जाणवत नव्हती, तर शांती जाणवत होती. ‘हे वातावरणातील शिवतत्त्वामुळेच आहे’, असे जाणवले.

ए. शेवटी वातावरणातील शांतीचे प्रमाण आणखी वाढले.

रामकली रागाची देवता श्रीराम ही शिवाला आळवत असल्याने आणि शिवामध्ये ज्ञानशक्ती असल्याने मला हे गायन ऐकतांना शेवटपर्यंत आज्ञाचक्रावरच स्पंदने जाणवत होती, तसेच माझी चंद्रनाडी कार्यरत होती.

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (६.४.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक